प्रसिद्ध पत्रकार आणि प्रतिपक्ष या यूट्य़ुब चॅनेलच्या माध्यमातून परखड राजकीय भाष्य करणारे पत्रकार भाऊ तोरसेकर यांना भाजपाच्या नेत्या आणि मीडिया सेलच्या प्रमुख श्वेता शालिनी यांनी पाठविलेली कायदेशीर नोटीस अखेर मागे घेतली. भाऊंनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात जो फटका बसला त्याला भाजपाच्या मीडिया सेलची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे म्हटले होते आणि त्यासाठी भाजपाच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांना जबाबदार धरले होते.
त्यावरून श्वेता शालिनी यांनी भाऊंना कायदेशीर नोटीस बजावली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. भाऊंनी नियमितपणे भाजपाच्या समर्थनार्थ पण तर्कसंगत असे व्हीडिओ केले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या झालेल्या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित करत व्हीडिओ केला. पण त्यावरून खळबळ उडाली. एरवी भाजपाला सूचना करणारे, प्रसंगी कानपिचक्या देणारे व्हीडिओ भाऊ करतात. त्यामुळे या व्हीडिओनंतर त्याची चर्चा रंगू लागली. श्वेता शालिनी यांनी तर कायदेशीर नोटीस बजावली. पण या सगळ्याचा परिणाम उलटाच झाल्याचे लक्षात आल्यानंतर ती नोटीस मागे घेण्यात आली.
हे ही वाचा:
टीम इंडियाचा कोच होण्यापूर्वी पाच ‘गंभीर’ अटी
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या राजेश अग्रवालांची प्रचारात आघाडी
अमोल काळेंच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट संघटनेत पोटनिवडणूक!
भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!
शालिनी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले की, माझी बाजू समजावून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकाराने व्हीडिओ बनवला ही मला अपेक्षा नव्हती. त्यातूनच मी ही नोटीस पाठवली. आपल्याशी माझा कोणताही व्यक्तिगत वाद नाही. त्यामुळे ही कायदेशीर नोटीस मी परत घेत आहे.
भाऊंना ही नोटीस पाठविण्यात आल्यानंतर भाऊंच्या समर्थनार्थ अनेकांनी विविध सोशल माध्यमांत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या सगळ्याचा परिणाम खोलवर झाला आणि ही नोटीसच मागे घेतली गेली.