भारतीय संविधानिक मूल्य आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित भारतीय समाजावर आघात करणाऱ्या कमुनिस्ट माओवादी व फुटीरतावादी अतिरेकी शक्तींना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावर नक्षलवादाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे यांचे व्याख्यान होणार असून ज्येष्ठ विधीज्ञ उदय वारुंजीकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. शुक्रवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दादर येथील राजा शिवाजी विद्यालय येथे होणार आहे.
शहरी माओवादी चळवळींची कार्यशैली आणि विविध संघटनांचे मुखवटे धारण केलेले त्यांचे शहरी फ्रंटल संघटनाच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आणि महत्त्व यावर व्याख्यान होणार आहे.
हेही वाचा..
चेपॉकनंतर धोनीच्या हृदयात वानखेडेचे खास स्थान
आशुतोष शर्माला आवडते फिनिशरची भूमिका
तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे कोरटकर लपून होता!
क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या घरी नन्ही परीचे आगमन
अधिवक्ता परिषद, समता परिषद, देव-देश प्रतिष्ठान आणि विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.