इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान इस्रायलने दहशतवादी संघटना हमासला साथ देणाऱ्या हिजबुल्लाह संघटनेलाही लक्ष्य केले आहे. इस्रायलने लेबेनॉनमध्ये दोन हवाईहल्ले केले. त्यात एकूण १० जणांचा मृत्यू झाला.
इस्रायलच्या सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हिजबुल्लाहच्या कमांडर राडवान दलाचा वरिष्ठ कमांडर अली डिब्ज याला ठार केले आहे. या हल्ल्यात डेप्युटी हसन इब्राहिम इस्साही मारला गेला आहे. तसेच, दक्षिणेकडील शहर नबातियेहमध्ये झालेल्या एका हल्ल्यात आणखी एक हिजाबुल्लाह दहशतवादी मारला गेला. हवाईहल्ल्यात आमचे तीन सैनिक मारले गेल्याचा दाव हिजाबुल्लाहने केला आहे.
हे ही वाचा:
‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’
मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!
हल्दवानी हिंसाचार: मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजावर बंदी!
हिजाबुल्लाह संघटनेने मृतांबाबत अधिक माहिती न देता त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. डिब्सवर गेल्या आठवड्यातही एक हल्ला झाला होता. त्यामधून तो बचावला होता.हिजबुल्लाहने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची शपथ घेतली आहे. लेबेनॉनचे कार्यवाहक पंतप्रधान नजीब मिकाती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. परिस्थिती शांततापूर्ण व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे.
आम्ही सर्वांना तणाव कमी करण्याचे आवाहन करत असताना इस्रायलकडून लेबेनॉनमध्ये हवाईहल्ले करून शांतताभंग करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते एवी हायमन यांनी हिजबुल्लाहच्या नियमित हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. आमची परीक्षा पाहू नका, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.