लाटेक्’चे प्रशिक्षण आता मराठीतही

लाटेक्’चे प्रशिक्षण आता मराठीतही

अकादमिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लाटेक् आज्ञावलीचे प्रशिक्षण आता मराठीतही उपलब्ध असणार आहे. या प्रशिक्षणाच्या भाषांतरीत आवृत्तीचा समावेश राजभाषादिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगावचा रहिवासी असलेल्या निरंजन या तरूणाने लाटेक्’च्या प्रशिक्षणासाठीच्या सुचनांचे भाषांतर केले आहे.

हे ही वाचा:

“नौटंकी बंद करा” देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला ठणकावले.

लाटेक् ही अकादमिक वर्तुळात प्रिय असलेली मुक्त आणि मोफत आज्ञावली आहे. या आज्ञावलीचा वापर दस्तऐवजीकरण करण्यासाठी केला जातो. आजवर लर्नलाटेक्.ओआरजी या संकेतस्थळावर लाटेक्’चा अभ्यासक्रम मोजक्याच भाषांत उपलब्ध होता. यात इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, व्हिएतनामी आणि तुर्की भाषेत उपलब्ध होते. यामध्ये कोणत्याही भारतीय भाषेचा देखील समावेश नसताना आता त्यात मराठीचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत खुद्द निरंजनने बोलताना सांगितले की, लर्न लाटेक्.ओआरजी नावाची साईट लाटेक्’च्या अनेक तज्ञांनी तयार केली. त्याच्यामध्ये लाटेक् प्रकल्पात जे लोक समाविष्ट आहेत त्यांचाही सहभाग होता. ‘लाटेक्’च्या निर्मात्या तज्ञांनीच जर लाटेक्’च्या वापराच्या मार्गदर्शक सुचना लिहील्या असतील तर त्या सामान्य माणसासाठी नक्कीच उपयोगाच्या आहेत. ही सगळी सामग्री त्यांनी मुक्त ठेवली आहे. त्यामुळे त्याचं भाषांतर करू शकतो असं मला वाटलं आणि त्यांनीच त्याची अधिकृत भाषांतरं घ्यायला सुरूवात केली होती, आणि तशी विनंती सुद्धा केली होती. तर मग मी पण सहभाग घेऊन मराठी भाषांतर करायला सुरूवात केली. या कामात जरा खंड पडला पण ते काम पूर्ण झालं आणि राजभाषा दिनीच मी त्यांना भाषांतर स्वीकारण्याची विनंती पाठवली आणि ती मान्यही झाली.

Exit mobile version