‘स्वा. सावरकरांचे जीवन देशवासीयांसाठी प्रेरणादायी’

‘स्वा. सावरकरांचे जीवन देशवासीयांसाठी प्रेरणादायी’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे.

‘त्याग आणि धैर्याचे प्रतीक, थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. मातृभूमीच्या सेवेत समर्पित त्यांचे जीवन देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘वीर सावरकर, परम देशभक्त आणि अदम्य साहसी व्यक्ती, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी तारा होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि आपल्या शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित केला. अंधारकोठडीचा अमानुष छळही त्यांना मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेच्या निर्धारापासून परावृत्त करू शकला नाही.’

हे ही वाचा:

युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ

पाकिस्तान लष्करात दोन हिंदू अधिकारी

काय घडतंय युक्रेनमध्ये?

जापनीज बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची २७ व्या मजल्यावरून उडी

महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले आहे. ‘हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण… स्वातंत्र्याचे सच्चे उपासक हिंदुत्वाचे जाज्वल्य, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोरदार सावरकर यांना स्मृतीदिनी कोटी कोटी अभिवादन’ असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करत म्हटले आहेकी, ‘अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला।। संपूर्ण जीवन मातृभूमीच्या चरणी अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

Exit mobile version