मुस्लिमांनी फेकलेले दगड, विटा स्वसंरक्षणार्थ!

संभल येथील दगडफेक करणाऱ्या कुटुंबाना 'सपा'कडून ५ लाखांची मदत!

मुस्लिमांनी फेकलेले दगड, विटा स्वसंरक्षणार्थ!

समाजवादी पक्षाचे १० सदस्यीय शिष्टमंडळ सोमवारी (३० डिसेंबर) उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर एसपीच्या शिष्टमंडळाने संभल हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी पोलीस प्रशासनही उपस्थित होते. विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे म्हणाले की, या सरकारला मुस्लिमांप्रती सहानुभूती नाही. हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करून लोकांमध्ये तेढ निर्माण करून त्यांचे राजकारण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

माता प्रसाद पांडे यांनी संभल येथील जामा मशिदीजवळ बांधण्यात येत असलेल्या पोलीस चौकीवरही प्रश्न उपस्थित केला. सरकारवर हल्लाबोल करत त्यांनी निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप करत संपूर्ण राज्याचे रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचे सांगितले. योगी आदित्यनाथ ज्या गोरखपूरमधून येतात, तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही चांगली नाही. रोज गोळीबार होत आहे. यावेळी सपा खासदार झियाउर रहमान बर्क हे सुद्बा उपस्थित होते.

हे ही वाचा : 

मुस्लीम तरुणांना कट्टरपंथी बनवल्याच्या आरोपाखाली बांगलादेशी दहशतवाद्याला ७ वर्षांची शिक्षा!

पुण्यात रेल्वे उलटवण्याचा कट; रेल्वे मार्गावर सापडला गॅसने भरलेला ‘सिलेंडर’

बांगलादेशात हिंदूंच्या दुकानांवर हल्ला, ५० हून अधिक दुकाने जळून खाक!

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

सपाच्या शिष्टमंडळाचे नेते लालबिहारी यादव यांनीही पोलिस प्रशासनावर आरोप केले आणि म्हणाले की, पोलिस प्रशासनाने ज्याला पाहिजे तसा त्रास दिला. या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यांच्या हत्येचा गुन्हा अद्याप का दाखल झाला नाही? ते म्हणाले की, मुस्लिमांनी फेकलेल्या विटा आणि दगड हे स्वसंरक्षणार्थ होते.

दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी शाही जामा मशीद किंवा हरिहर मंदिर सर्वेक्षणावरून उसळलेल्या हिंसाचारात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. २९ पोलीस कर्मचारी आणि इतर लोक जखमी झाले. या गदारोळानंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली असून या हिंसाचाराचे खरे गुन्हेगार कोण आहेत हे तपासानंतरच समोर येईल. सध्या हिंसाचारानंतर विरोधी पक्षांनी हिंसाचारावरून राजकारण तापवले आहे.

Exit mobile version