सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुरू आहे. त्यात १४ मार्च रोजी एकनाथ शिंदे यांच्या वतीने वकील आपला युक्तिवाद करत आहेत. सकाळी हरिश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर महेश जेठमलानी यांनीही आपल्या अशिलांची बाजू मांडली. १४ मार्च रोजी झालेली सुनावणी संपली असून आता तुषार मेहता आणि कपिल सिब्बल हे १५ मार्चला आपला युक्तिवाद करणार आहेत.
ते म्हणाले की, अपात्रतेची नोटीस फक्त १६ आमदारांना देण्यात आली. कारण ३९ आमदारांमध्ये त्यांना गट पाडायचे होते. या मुद्द्यांवर न्यायालयाने म्हटले की, तुम्ही मूळ मुद्द्यांवर या. मेरीटवर युक्तिवाद करा. तसेच हरिश साळवे आणि तुमच्या युक्तिवादात विसंगती असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली.
हे ही वाचा:
काय अवस्था आली पाहा!! पंजाब पोलिस आता लग्नातही वाजवणार बँड
म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या
आजपासून सुरू होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरीश साळवे काय बोलणार?
मोदींना संपवायला हवे; राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रंधवा यांचे फुत्कार
त्याआधी, हरीश साळवे यांनी म्हटले की, जर अविश्वास असेल तरच बहुमत चाचणी होते. त्यामुळे तसा अविश्वास वाटला असेल म्हणून बहुमत चाचणी बोलवली असेल. राज्यपालांना अविश्वास वाटला असेल म्हणून त्यांनी तशी चाचणी करायला लावली. त्यात कोणतीही चूक केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला म्हणजेच त्यांना हे ठाऊक होते की, बहुमत आपल्यापाशी नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. तो राजीनामा दिल्यावर शिंदे यांनी बहुमत सिद्धही केले. जोपर्यंत हे आमदार अपात्र होत नाहीत तोपर्यंत ते आमदार म्हणून काम करू शकतात.
नीरज कौल म्हणाले होते की, यात मुद्दा हा पक्षफुटीचा नसून पक्षांतर्गत वादाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही म्हणूनच आमदारांनी मविआतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. शिवाय, निवडणूक आयोगाने पक्ष कुणाचा हे ठरविले आहे. तो अधिकार त्यांचाच आहे. न्यायालयाचा नसतो.