‘कोलकात्यातील रुग्णालयावर झालेला हल्ला ममता बनर्जी पुरस्कृत’

पीडितेच्या पालकांच्या वकिलांनी केला आरोप

‘कोलकात्यातील रुग्णालयावर झालेला हल्ला ममता बनर्जी पुरस्कृत’

कोलकात्यात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर त्या आर. जी. कार रुग्णालयावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जी पुरस्कृत होता असा आरोप मृत महिला डॉक्टरच्या पालकांचे वकील विकास रंजन भट्टाचार्य यांनी केला आहे.

इंडिया टुडेशी झालेल्या मुलाखतीत भट्टाचार्य यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने या हल्ल्यात आपले गुंड घुसवले होते. या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात हे गुंड घुसले होते. त्यांनीच या सरकारी रुग्णालयाची मोडतोड केली. त्यातून आंदोलकांना घाबरविण्याचे प्रयत्न होते तसेच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर शरसंधान केले होते. विरोधकांनीच ही तोडफोड केल्याचा आरोप ममतांनी केला होता. पण पोलिसांनी जे ३७ लोक या घटनेनंतर पकडले त्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

बलात्कार पीडितेचे पालक संतापले! म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईनुद्दीनला अटक

त्रिपुरामध्ये १६ बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना अटक !

या घटनेत पकडलेल्या लोकांत एक २४ वर्षीय व्यायामशाळा प्रशिक्षकही होता. सौविक दास असे त्याचे नाव असून तो या तोडफोडीत सहभागी असल्याचे त्याने मान्य केले पण भावनेच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे त्याने म्हटले. पोलिस तपासात कोणते दोष आहेत, यावर भट्टाचार्य म्हणाले की, पोलिसांनी ज्या पद्धतीने हा तपास केला आहे ते पाहता कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे हे प्रकरण सोपविले आहे.

कोलकाता पोलिसांनी कसा हा तपास केला? प्रारंभी रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या पालकांना सांगितले की, तुमची मुलगी आजारी आहे. पण अर्ध्या तासाने त्यांनी फोन केला की, तिने आत्महत्या केली. जिथे मुलीचा मृतदेह सापडला तिथे डॉक्टर उपस्थित होते, त्यांना हे कळले नसेल का की ही हत्या आहे की आत्महत्या? याचा अर्थ ज्या पद्धतीने हा तपास व्हायला हवा होता, तसा तो झालेला नाही.

भट्टाचार्य म्हणाले की, पीडितेच्या मृतदेहावर त्वरित अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न झाला. पण तो एक महत्त्वाचा पुरावा होता. मग पोलिसांनी म्हटले की, मुलीचे अंत्यसंस्कार पालकांनीच केले. पण विद्यार्थी नेत्यांमुळे हा तपास होऊ शकला.

Exit mobile version