बांगलादेशातील हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या अटकेविरोधात काल (२६ नोव्हेंबर) झालेल्या आंदोलनादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला. सैफुल इस्लाम असे मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव असून ते चट्टोग्राम जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य होते. चिन्मय कृष्ण दास यांना जिल्हा न्यायालयात हजार केल्यानंतर त्यांना घेवून जात असताना ही घटना घडली. यावेळी साधू चिन्मय प्रभूंचे सुमारे दोन हजार समर्थक उपस्थित होते.
साधू चिन्मय प्रभूंना नेत असताना पोलीस, वकील, समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये वकील सैफुल इस्लाम यांचा मृत्यू झाला तर अन्य १० लोक जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांना अटक केली आहे. दरम्यान, चितगाव वकील संघाचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी हा मृत्यू नसून हत्या असल्याचे म्हटले आहे.
आंदोलकांनी वकिलाला मारहाण करून त्याची हत्या केल्याचे नाझिम उद्दीन चौधरी यांनी म्हटले. वकिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर चितगावमध्ये सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा :
कुस्तीपटू बजरंग पुनिया चार वर्षांसाठी निलंबित!
मुस्लिम मते जिथे जिथे, उबाठाचा विजय तिथे तिथे!
‘जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच संविधान दिन साजरा’
काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!