विधिच्या विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ

विधिच्या विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ

ठाकरे सरकार शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहे हे सत्तेत आल्यापासून आपण चांगलेच अनुभवले आहे. राज्यातील सर्वच परीक्षांचा गोंधळ ठाकरे सरकारच्या काळात झालेला आहे. विधिच्या अंतिम परीक्षांचा गोंधळ आता अधिक वाढलेला आहे. अंतिम परीक्षा देऊन अजूनही निकाल हातात न आल्यामुळे आता या विद्यार्थ्यांना नोकरीसुद्धा गमवावी लागत आहे.

अंतिम परीक्षेचा निकाल अजूनही न लागल्यामुळे अनेकजण आलेली नोकरीची संधी आता गमावत आहेत. चौथ्या सत्राचा अजून निकालही नाही, तसेच अंतिम परीक्षेचा निकालही नाही. त्यामुळे आता या सर्वांपुढे अनेक पेच उभे राहिले आहेत.

विधिच्या अंतिम परीक्षा इंटरनेटवरून ऑनलाइन पद्धतीने झाल्या. त्यामुळे अनेकांनी नोकरीची आशा बाळगण्याची तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याची सुरुवात केली.

हे ही वाचा:

महापालिकेने घेतला घोटाळ्याचा ‘आश्रय’

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती

भाजपाचे ठरले…देणार फक्त ओबीसी उमेदवार

संजय राऊतांची योग्य चौकशी करा!

गतवर्षी अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षातील मूल्यमापन सरासरीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी या गोष्टीला विधिज्ञ परिषदेने आक्षेप घेतला होता. परंतु परिस्थिती पूर्ववत झाल्यावर आधीच्या बॅचच्या परीक्षा घ्याव्यात, असे पत्रकही काढले. मात्र गेल्या वर्षभरातही विद्यापीठाने परीक्षाच घेतल्या नाहीत. त्यामुळेच आता चौथ्या सत्राच्या निकालांबाबत पेच निर्माण झालेला आहे.

गतवर्षी राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला होता. उच्चशिक्षण विभागाने घातलेला हा गोंधळ अजूनही पुरता निस्तरला गेला नाही. तोपर्यंत आता विधि अभ्यासक्रमाचे नवीन कोडे सरकारने घातले. भारतीय विधिज्ञ परिषदेने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची सूचना कायम ठेवल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पदवीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

राज्याने काढलेला एक निर्णय आणि विधिज्ञ परिषदेमध्ये नसलेल्या तारतम्यामुळे यंदा पदवीपर्यंत टप्पा कसा पूर्ण करायचा असा विद्यार्थ्यांना पेच पडलाय. आता विद्यार्थ्यांना पुन्हा मागच्या रद्द केलेल्या परीक्षा द्याव्या लागणार का, अशीच धास्ती वाटत आहे.

Exit mobile version