ॲपलचे सह-संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराजमध्ये आल्या आहेत. तत्पूर्वी, शनिवारी (११ जानेवारी) त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाश नंदगिरी महाराज देखील उपस्थित होते. यावेळी स्वामी कैलाशानंद गिरी यांनी लॉरेन पॉवेल जॉब्स यांना नवे दिले आहे.
यावेळी स्वामी कैलाश नंदगिरी यांनीही लॉरेनचे नाव ‘कमला’ ठेवले आहे. स्वामी कैलाशानंद नंदगिरी महाराज म्हणाले, शिष्य म्हणून ती माझ्या मुलीसारखी आहे. मी तिचे नाव कमला ठेवले आहे. मी त्यांना माझे गोत्रही सांगितले आहे. ती दुसऱ्यांदा भारतात आली असून कुंभमेळ्यात काही दिवस मुक्काम करणार आहे. त्यांना काही प्रश्न असल्यास ते गुरुजींना विचारू शकतात. आपली परंपरा जगभर पसरली पाहिजे असे माझे मत आहे. पण ती परंपरा ही विचार, तत्त्व आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी असावी, असे स्वामी म्हणाले.
दरम्यान, लॉरेन जॉब्स आज (१२ जानेवारी) आपल्या ६० सदस्यांच्या टीमसह प्रयागराजमध्ये दाखल झाल्या. याठिकाणी होणाऱ्या दोन प्रमुख अमृत (शाही) स्नानात त्या सहभागी होतील, ज्यामध्ये मकर संक्रांती स्नान आणि मौनी अमावस्या स्नान यांचा समावेश आहे. याआधी स्टीव्ह जॉब्सही भारतात आले होते. १९७० च्या दशकात ते सुमारे सात महिने भारतात राहिल्याचे सांगितले जाते.
हे ही वाचा :