महेंद्रगिरी या प्रोजेक्ट १७ अ श्रेणीतील शेवटच्या युद्धनौकेचे उपराष्टÑपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी माझगाव डॉक येथे जलावतरण करण्यात येणार आहे. महेंद्रगिरी हे नाव ओरिसा राज्यात स्थित पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून देण्यात आले आहे. ही प्रोजेक्ट १७ अ श्रेणीतील सातवी युद्धनौका आहे. यामध्ये प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. नव्याने नामकरण केलेली महेंद्रगिरी ही तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे.
हेही वाचा..
आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न
राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता
आदिवासी खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करणार
भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद
युद्धनौका डिझाईन क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने प्रोजेक्ट १७ अ जहाजांची रचना केली आहे. ‘आत्मनिर्भारते’च्या देशाच्या दृढ वचनबद्धतेला अनुरूप प्रकल्प १७ अ जहाजांच्या उपकरणे आणि प्रणालींसाठी ७५ टक्के सामग्री स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहेत. यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) यांचा समावेश आहे. महेंद्रगिरी युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होणे हे भारताने आत्मनिर्भर नौदलाच्या उभारणीत केलेल्या अतुलनीय प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे.