‘टेस्ला’ हवी आहे? करा अजून थोडी प्रतीक्षा

‘टेस्ला’ हवी आहे? करा अजून थोडी प्रतीक्षा

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी टेस्लाचे भारतातील आगमन लांबलेलेच आहे. एलोन मस्क आणि भारत सरकार यांच्यामधील आयात शुल्क वरून चालू असलेली रस्सीखेच हे या विलंबाचे कारण आहे.

भारतामध्ये सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. अशावेळी इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेसला भारतामध्ये येऊ इच्छित आहे. परंतु आयात शुल्कामुळे कंपनीला भारतात येण्यास विलंब होत आहे. नुकतीच टेसला ची एक गाडी पुणे येथे दिसली होती परंतु टेसलाचे उत्पादन केंद्र असलेल्या शांघाय येथून पुण्यात आणण्यासाठी बराच त्रास उचलावा लागला होता त्यामुळे मस्क यांना अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी भारतातच इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणे सोयीचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

पूर, दरडींनंतर महाडवासियांसमोर आता नवे संकट!

सिंधूस्थान झिंदाबाद!

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

बीडीडीच्या पुनर्विकासाचा पुन्हा शुभारंभ

या गाडीचे डॉलरमधील किंमत सुमारे ३९ हजार ९९० इतकी आहे. तीस लाख रुपयांच्या या गाडीवर आयात शुल्क लागू केल्यानंतर या गाडीची किंमत ६० लाख रुपयांपर्यंत जाते त्यामुळे ही गाडी खूप महाग ठरते. त्यामुळे संपूर्ण बांधीव गाडीवरती आयात शुल्कात सूट देण्यात यावी अशी मागणी वारंवार तेसला कडून करण्यात येत आहे.

भारतामध्ये ४० हजार डॉलर किंवा तीस लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्यांवर ती शंभर टक्के आयात शुल्क लागू केले जाते तर ४० हजार डॉलर पेक्षा कमी किंमत असलेल्या गाड्यांवर ती ६० टक्के आयात शुल्क लागू केले जाते. त्यामुळे जर या गाडीवरील आयात शुल्क कमी केले नाही तर ती भारतीयांसाठी चैनीची गाडीची ठरणार आहे. यापूर्वीदेखील अनेक वेळा आयात शुल्कावरून मस्क यांनी टीका केली होती.

मर्सिडीज बीएमडब्ल्यू यासारख्या आलिशान गाडी विक्रेत्या कंपन्या यापूर्वीच भारतात दाखल झाल्या आहेत मर्सिडीजने त्यांचे उत्पादन भारतात करण्यास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी टेसला देखील अशाच प्रकारे गाड्यांचे उत्पादन भारतात सुरू करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version