लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक खालावल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लता मंगेशकर यांना हलवण्यात आले असून आता त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. गेल्या २७ दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात येत होती. मात्र, शनिवार ५ फेब्रुवारी रोजी अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याची माहिती मिळाली आहे. पाच डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या कोणालाही लता मंगेशकर यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे यांच्या डीआरडीओबद्दलच्या वक्तव्याला मिळाले प्रत्युत्तर

स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’

‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोबतच न्यूमोनियाचेही निदान झाले होते. लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. रुग्णालयात त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

Exit mobile version