श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार

निधनाआधी भजन, श्लोक रेकॉर्ड करून ठेवले

श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात भारतरत्न आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे स्वर गुंजणार आहेत. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या भाविकांना लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी, भजने आणि श्लोक ऐकायला मिळणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनाला उपस्थित राहण्याची लता दिदींची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. निधनाआधी त्यांनी तयारीदेखील सुरू केलेली. काही भजने आणि श्लोक रेकॉर्ड करुन ठेवले होते.

लता मंगेशकर यांनी अनेक विविध भारतीय भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांची अनेक गाणी आजही आजारामार आहेत. बॉलिवूड आणि मराठी सिनेमांसह त्यांनी देशभक्तीपर गीते आणि भावगीतंदेखील त्यांनी गायली आहेत. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमात सहभागी होण्याची लता दिदींची इच्छा होती, अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांच्या निकटवर्ती व्यक्तीने दिली आहे.

श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हावे यासाठी लता दिदींनी जोरदार तयारीला सुरुवात केली होती. लता दिदींनी निधनाआधी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनासाठी काही भजने आणि श्लोक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे ते श्लोक आणि गाणी उद्घाटन सोहळ्यामध्ये वाजविली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!

सोमवारी सुनावणी, अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करा!

हमासने गंभीर चूक केली आहे, हे त्यांच्या लक्षात येईल!

स्वर कोकिळा लता मंगेशकर  यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एक सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून लता दीदींची ओळख होती. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये झाली होती. लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणूनही ओळखले जाते. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या नावे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स’मध्ये विक्रम नोंद आहे. १९७४ ते १९९१ या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्स त्यांनी केल्या होत्या.

Exit mobile version