पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार

नातेवाईकांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणामध्ये हिराबा अनंतात विलीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्यावर अहमदाबाद येथील सेक्टर ३० मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांचे बंधू यांनी हिराबा यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता हिराबा यांचे रुग्णालयात निधन झाले. बुधवारी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृता खालावत गेली. त्या १०० वर्षांच्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेव्हापासून अहमदाबाद येथे दाखल झाले होते. ते आईच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर शुक्रवारी हिराबा यांचे प्राणोत्क्रमण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे अंत्यविधी केले. त्यावेळी त्यांचे सर्व नातेवाईक तिथे उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात हिराबा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिराबा यांच्या पश्चात पाच मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसांची जय्यत तयारी

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात, जबर जखमी

२०३० पर्यंत बहुतांश वाहने पर्यायी इंधनावर धावतील

 

हिराबा या पंतप्रधान मोदी यांचे कनिष्ठ बंधू पंकज यांच्याकडे राहात असत. तिथे त्यांना भेटण्यासाठी नरेंद्र मोदी नियमित जात असत. गुजरात निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधान तिथे आलेले असताना त्यांनी हिराबा यांची भेट घेतली.

हिराबा यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेश येऊ लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही सांत्वनपर संदेश ट्विटरच्या माध्यमातून लिहिला.

महाराष्ट्रातूनही अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शानदार शतक ईश्वरचरणी लीन झाल्याची भावना आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version