भारत आणि इंग्लंड एक दिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. या विजयासहित इंग्लंडने भारत-इंग्लंड मालिकेत बरोबरी साधली आहे. शुक्रवारी भारत आणि इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने धुवाधार बॅटिंग करत भारतावर विजय मिळवला. त्यामुळे आता या मालिकेतील अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताकडून ओपनर्स शिखर धवन आणि रोहित शर्मा चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. पण त्या नंतर कर्णधार विराट कोहली आणि के.एल.राहुल यांनी आक्रमक खेळी करत भारताचा डाव सावरला. राहुलने १०७ धावा करत शतक ठोकले तर कोहलीने ६६ धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली. पंत ने ४० चेंडूत ७७ धावा केल्या तर पांड्याने १४ चेंडूत ३५ धावा कुटल्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ३३६ धावा केल्या.
हे ही वाचा:
२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?
भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार
पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार
फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला
विजयासाठी ३३७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. पहिल्या विकेटसाठी रॉय आणि बेस्ट्रॉव यांनी ११० धावांची भागीदारी रचली. या सामन्यात रॉयने ५५ धावा करत अर्धशतक ठोकले तर बेस्ट्रॉवने शतक ठोकत १२७ धावा केल्या. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ५२ चेंडूत ९९ धावा ठोकत इंग्लंडचा विजय निश्चित केला. जॉनी बेस्ट्रॉवला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.