चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणार सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गेल्या चार वर्षातले सर्वात मोठे क्रीडापटूंचे पथक सहभागी होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. आज पंचकुला येथील इंद्रधनुष प्रेक्षागृहात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठीचे बोधचिन्ह, प्रेरकगीत, जर्सी आणि मॅस्कॉट यांचे अनावरण केले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावर्षी खेळों इंडिया युथ गेम्समध्ये तब्बल साडे चार हजार खेळाडू सहभागी होत आहेत.

यावर्षी खेळों इंडिया युथ गेम्समध्ये अस्सल भरतीय मातीतल्या पारंपरिक खेळांनाही स्थान देण्यात आले आहे. या खेळांच्या संरक्षणावर भर देत केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की गटका, कलरीपयटू, थंग-ता, मल्लखांब आणि योगासने हे पारंपरिक क्रीडाप्रकार आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये समाविष्ट असतील.

हे ही वाचा:

पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’

तर पुढे ते म्हणाले की, युवा क्रीडास्पर्धा आणि नुकत्याच संपलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांच्यामुळे युवकांना भविष्यात अधिक मोठी उद्दिष्ट्ये साध्य करण्याची प्रेरणा मिळेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणाले की, क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून दाखवावी यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

यावर्षीच्या खेळों इंडिया युवा खेळांसाठी ‘जया’ नावाचे काळवीट आणि ‘विजय’ नामक वाघ हे क्रीडा स्पर्धेसाठीचे मॅस्कॉट असणार आहेत. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठी हरीयाणाचा ‘धाकड’ हा मॅस्कोत असणार आहे. ४ जून ते १३ जून या कालावधीत चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा हरियाणामध्ये होणार आहेत.

Exit mobile version