आयटीबीपीची सर्वात मोठी कारवाई, लडाखमध्ये १०८ किलो सोने जप्त!

दोघांना अटक

आयटीबीपीची सर्वात मोठी कारवाई, लडाखमध्ये १०८ किलो सोने जप्त!

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाने मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १०८ किलो सोन्याचे बार जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बारची किंमत ८४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तस्करांकडून सोन्याच्या बार व्यतिरिक्त काही चायनीज खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले आहे. त्सेरिंग चिनबा आणि स्टैनजिन दोरग्याल अशी अटक करण्यात दोन तस्करांची नावे असून न्योमा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

आयटीबीपीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी (९ जुलै) दुपारी १.३० च्या सुमारास गस्ती पथकाला सीमेपासून एक किमी अंतरावर श्रीरामपाल भागात दोन व्यक्ती संशयित आढळून आल्या. दोघेही घोड्यांवर स्वार होते, दोघांनाही थांबण्यास सांगितल्यास ते सीमेच्या दिशेने पळू लागले. आयटीबीपीच्या गस्ती पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून १०८ किलो सोन्याची बिस्किटे मिळाली. ही सर्व सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली असून याची किंमत ८४ कोटी रुपये इतकी आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावरून विधानसभेत भाजपचे नेते कडाडले, विरोधकांची पळापळ!

मुस्लीम महिलाही पोटगी मागू शकतात

बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर…. भूमिका घेताच विरोधक पळाले!

वरळी हिट अँड रन…मिहीर शहा १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत

गस्ती पथकाने दोन्ही तस्करांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून दोन मोबाईल, एक दुर्बीण, काही चायनीज खाद्यपदार्थ, एक टॉर्च आणि अनेक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. आयटीबीपीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेले सोने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे देण्यात येणार आहे.

Exit mobile version