वायनाडमध्ये भूस्खलन; शेकडो लोक अडकल्याची भीती, १०६ जणांचा मृत्यू !

एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

वायनाडमध्ये भूस्खलन; शेकडो लोक अडकल्याची भीती, १०६ जणांचा मृत्यू !

केरळमध्ये पावसाने हाहाःकार माजवला असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवार, ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय मृतांची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले असण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू असून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. या घटनेत दोन लहान मुलांसह १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. मेप्पाडी भागात आधी रात्री २ वाजताच्या सुमारात भूस्खलानाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे चार वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झालं. दरम्यान, भूस्खलानाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

एका निवेदनात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, “वायनाडमधील भूस्खलनादरम्यान बचाव कार्य सुरू असून समन्वय साधला जाईल. घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. तसेच मंत्रीही वायनाडला भेट देऊन आढावा घेतील,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

वायनाडमधील भूस्खलानाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर (ट्विट) पोस्ट करत म्हटले आहे की, “भूस्खलनाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसोबत आम्ही आहेत आणि जखमींबाबतही प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तेथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल.”

हे ही वाचा:

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

हावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

राहुल गांधी म्हणाले की, “वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे अत्यंत दुःखी असून ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत अशा कुटुंबांप्रती संवेदना आहेत. आशा आहे की अडकलेल्यांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी आणले जाईल. केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांनी आश्वासन दिले आहे की बचाव कार्य सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांशी बोलून वायनाडला शक्य ती सर्व मदत देण्याची विनंती करणार,” असं राहुल गांधी म्हणाले.

Exit mobile version