साताऱ्यात आंबेघरमध्येही कोसळली दरड; १२ मृत्युमुखी पडल्याची भीती

साताऱ्यात आंबेघरमध्येही कोसळली दरड; १२ मृत्युमुखी पडल्याची भीती

महाडच्या तळई गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२ लोक मृत्युमुखी पडल्याचे कळते. स्थानिक प्रशासनाने याठिकाणी मदतकार्य सुरू केले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान असून त्यामुळे ठिकठिकाणी अशा दुर्घटना घडत आहेत.

मोरणा विभागातील आंबेघर येथे ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आहेत.

गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
Exit mobile version