खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे  विस्कळीत

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जाेरदार पावसाचा फटका

खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे  विस्कळीत

खंडाळा घाटात मंकी हिल ते ठाकूर वाडी या दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दरड काेसळल्याने मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली हाेती. राज्यासह पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जाेरदार पावसाचा फटका बसून खंडाळा घाटात दरड काेसळली. ही दरड मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर काेसळली. त्यामुळे पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाली हाेती. अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या यामुळे रद्द कराव्या लागल्या.

हे ही वाचा:

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या

दरड काेसळल्याची माहिती मिळताच तातडीने दरड हटवून रेल्वे मार्ग माेकळा करण्याचे काम सुरू झाले. परंतु पुणे जिल्ह्यात पावसाचा जाेर असल्याने मदत कार्यात अडथळे येत हाेते. दरड काेसळल्याची घटना घडल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या खंडाळा, लाेणावळा तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या कर्जत स्थानकावर थांबवण्यात आल्या हाेत्या. दरड हटवून मुंबई – पुणे रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

Exit mobile version