हिमाचलमध्ये भूस्खलन, २ मजुरांचा मृत्यू तर ५ जण जखमी!

जंगा मार्गावरील अश्वनी खड येथे घडली दुर्घटना

हिमाचलमध्ये भूस्खलन, २ मजुरांचा मृत्यू तर ५ जण जखमी!

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीची प्रकरणे संपली आहेत, परंतु आता भूस्खलनाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला येथे मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले.या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.शिमला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन कामगारांचे मृतदेह ताब्यात घेतले व पोस्टमॉर्टमसाठी शिमला येथील आयजीएमसी हॉस्पिटल येथे नेण्यात आले.तसेच या दुर्घटनेत पाच कामगार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास शिमल्यातील जंगा मार्गावरील अश्वनी खड येथे ही भूस्खलनाची दुर्घटना घडली.भूस्खलनात गाडलेल्या दोन मजुरांचे मृतदेह काढून आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले.आयजीएमसीचे सीएमओ महेश यांनी सांगितले की, भूस्खलनात गाडलेल्या दोन मजुरांना सकाळी आणण्यात आले होते, परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवालांच्या पीएसह आप नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे!

सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

‘कब्रस्तान नव्हे, हे महाभारतकालीन लाक्षागृह’

धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि होमगार्डचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने अग्निशमन दल आणि होमगार्डच्या जवानांच्या मदतीने सुमारे तासाभरात मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.यामध्ये राकेश (३४) आणि राजेश कुमार (३६) अशी मृतांची नावे असून ते बिहारचे रहिवासी आहेत.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आयजीएमसी शिमला येथे पाठवण्यात आले आहेत. तसेच राहुल कुमार,मेघ साहनी,वर्षीय बैजनाथ राम,अशोक राम आणि टोनी कुमार अशी जखमींची नावे असून हे सर्व बिहार आणि चंबा येथील रहिवासी आहेत.

Exit mobile version