घरमालकांनो भाडेकरूंनची माहिती पोलिसांना द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा

सुरक्षेखातर घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांच्या वेब साइटवर अपलोड करा.

घरमालकांनो भाडेकरूंनची माहिती पोलिसांना द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा

भाड्याच्या घरात राहणाऱ्या किंवा दुकान भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिस स्थानकात देणे बंधनकारक असून सुद्धा मुंबईकर भाडेकरूनची माहिती पोलिस स्थानकात देत नाही. यावरून मुंबईकर घर व दुकान मालक या सुचनेकडे कानाडोळा करत असल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. या भाडेकरूनमध्ये दहशतवादी, तसेच समाजकंठक व परदेशी नागरिकांकडून आश्रयस्थानाचा दूरउपयोग होण्याची भीती असल्याने ही सक्ती करण्यात आली आहे. तसेच भाडेकरूनची माहिती न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या अगोदर अनेक घटनांमध्ये आरोपी भाड्याच्या घरात असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यास त्याचा गैरफायदा समाजकंटक, दहशतवादी तसेच परदेशी नागरिक घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आली असून, मुंबई पोलिसांनी या संदर्भात आदेश ही जारी केले आहेत.

हे ही वाचा:

कंगना राणौत राजकारणात, भाजपामध्ये जाण्याची इच्छा

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

मुंबई पोलिसांच्या वेब साईटवरील सिटीजन पोर्टलवर भाडेकरूची माहिती ऑनलाइन स्वरूपात भरणाची सुविधा आहे. या व्यक्तीला घर, दुकान भाड्याने देण्यात आले आहेत. त्यांचे तपशीलवार माहिती इथे भरायची आहे. तसेच जर व्यक्ती परदेशी असेल तर त्याचे राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्रमांक, जारी केल्याचे ठिकाण, श्रेणी आणि मुदत अशी माहिती भरावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच घरमालकाने या आदेशांचे उल्लंघन केल्यास घरमालकवर भादंवि १८६० च्या कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Exit mobile version