29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषतौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

तौक्ते चक्रीवादळ: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

Google News Follow

Related

तौक्ते चक्रीवादळ वेगाने गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे दिव, दमण, दादरा नगर हवेली, गुजरातमधील वेरावळ येथे अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात थैमान घालत असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातपासून काहीशे किलोमीटरवर आहे. येत्या काही तासात हे चक्रीवादळ पोरबंदरच्या भागात लँडफॉल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

गुजरातमध्ये धडकणारे हे चक्रीवादळ लक्षात घेता किनाऱ्यालगतच्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची ५४ पथके गुजरातमध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे वादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वीची तयारी करणे शक्य झाले आहे.

हे ही वाचा:

चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी

रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना

ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे

संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ

मुंबईत वादळाचा जोरदार तडाखा

आज दिवसभर मुंबईत या चक्रीवादळामुळे तुफानी पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईच्या समुद्रात असलेली दोन जहाजे उसळत्या लाटांमुळे अडकली. त्यात ४१० लोक अडकल्याचे कळते. या दोन्ही जहाजांचा शोध घेऊन त्यातील लोकांचे बचावकार्य भारतीय नौदलाने हाती घेतले आहे.

मुंबई सोबतच कोकण किनारपट्टीला देखील या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. अनेक घरांचे आणि आंबा बागायतदारांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. त्याशिवाय रायगड जिल्ह्यामध्ये विजेचे ३०० खांब पडल्याची घटना देखील घडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा