उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे असलेल्या बांके बिहारी मंदिराबाबत नवी माहिती समोर आली आहे. वृंदावन येथील बांके बिहारीलाल मंदिराच्या जमिनीची नोंद कब्रस्तान (मुस्लिम स्मशानभूमी) म्हणून नोंद झाली आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायालयाने तहसीलदारांकडून उत्तर मागितले आहे.
वृंदावन येथील बांके बिहारीलाल मंदिराच्या जमिनीची नोंद कब्रस्तान करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेच्या छटा तहसीलदाराकडून यासंदर्भात उत्तर मागितले आहे. बांके बिहारी महाराज यांच्या मालकीची जमीन २००४ मध्ये कब्रस्तानच्या नावावर कशी नोंदवली गेली, असा सवाल न्यायालयाने तहसीलदारांना विचारला आहे. श्री बिहारी जी सेवा ट्रस्ट मथुराने दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
याप्रकरणी वेळोवेळी नोंदी का बदलल्या जातात, असा सवाल न्यायालयाने महसूल अधिकाऱ्यांना केला आहे. शाहपूर गावातील १०८१ क्रमांकाचा भूखंड बांके बिहारी महाराज यांच्या मालकीचा असल्याचे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत नमूद केले आहे. ही गोष्ट १३७५ -१३७७ फ च्या राइट्स रेकॉर्डमध्ये नमूद आहे. बांके बिहारी महाराज यांच्या मालकीच्या जमिनीची कब्रस्तानच्या नावावर चुकीची नोंद करण्यात आल्याचे दाखल याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात ही चूक सुधारावी, असे याचिकेत म्हटले आहे. महसूल अधिकाऱ्यांना योग्य नोंदी करण्यास सांगावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १७ ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, असा एक अर्ज प्रलंबित आहे. आता महसूल विभागातील नोंदी कब्रस्तानपासून जुन्या लोकवस्तीत बदलण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
रोनाल्डो ठरला इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून समन्स
वंदे भारतमध्ये सिगारेटमुळे गोंधळ; धुरामुळे प्रवाशांची पळापळ
प्रकरण काय?
श्री बिहार जी सेवा ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, प्लॉट क्रमांक १०८१ हा पुरातन काळापासून बांके बिहारी महाराज यांच्या नावावर आहे. भोला खान पठाण याने महसूल अधिकार्यांच्या संगनमताने सदर जागेची २००४ मध्ये कब्रस्तान म्हणून नोंदणी केली होती.
याची माहिती मिळताच मंदिर ट्रस्टने आक्षेप नोंदवला. हे प्रकरण वक्फ बोर्डाकडे गेले आणि सात सदस्यीय समितीने चौकशी करून कब्रस्तानाची चुकीची नोंदणी केल्याचे समोर आले. असे असूनही या जमिनीवर बिहारीजींचे नाव नोंदवले गेले नाही. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आहे.