ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेट यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या एका अभ्यासात भारतात बनवलेल्या भारत बायोटेक लसीचे कौतुक केले आहे. या लसीची परिणामकारकता चांगली असून याचा कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचेही सांगितले आहे.
भारत बायोटेक प्रस्तुत पहिल्या टप्प्यातील या चाचणीच्या निकालातून लॅन्सेटने हा अहवाल सादर केला. भारत बायोटेक प्रस्तूत चाचणी असली तरी चाचणी प्रक्रियेत भारत बायोटेकचा हस्तक्षेप कुठेही नसल्याची माहिती चाचणी करणाऱ्यांनी दिली.
या अभ्यासकरता ३७५ लोकांची निवड करण्यात आली होती. लॉकडाऊन दरम्यान या लोकांवर चाचणी करण्यात आली होती. अहवालातून याचीही नोंद करण्यात आली आहे की, चाचणी दरम्यान रोज नव्याने येणाऱ्या केसेसची संख्या जास्त होती त्यामुळे चाचणीत भाग घेतलेल्यांना कोविड-१९ ची बाधा होण्याची शक्यताही जास्त होती.
https://twitter.com/ICMRDELHI/status/1352510323425611776?s=20
सॅम्पल साइझ जाणीवपूर्वक मोठा घेण्यात आला होता जेणेकरून व्हायरसच्या परिणामाचा बारकाईने अभ्यास करता येईल. असेही अहवालातून सांगण्यात आले.
कोवॅक्सिन या लसीची निर्मिती भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी मिळून केली आहे. ही लास पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. भारत सरकारने काही आठवड्यापूर्वी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इंस्टीट्युटच्या कोव्हीशील्ड सोबत कोवॅक्सिनलासुद्धा मान्यता दिली होती.