नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी लालू कुटुंबीयांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव पाटणा येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.लालूंची चौकशी करण्यासाठी ईडीची टीम दिल्लीहून आधीच पाटण्या आली होती.विशेष म्हणजे बिहारमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लालूप्रसाद यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जावे लागले.
सोमवारी (२९ जानेवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लालू प्रसाद त्यांच्या निवासस्थानातून चौकशीसाठी ईडी कार्यालयासाठी निघाले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारतीही उपस्थित होत्या.लालू प्रसाद यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक रविवारी संध्याकाळी पाटण्याला पोहोचले होते.दरम्यान, पाटण्यातील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालया बाहेर मोठ्या संख्येने आरजेडी कार्यकर्ते जमा झाले असून केंद्र सरकारचा निषेध करत होते.तसेच कार्यकर्त्यांकडून निदर्शने देखील करण्यात आली.
हे ही वाचा:
मालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!
फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!
‘ऍनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर, आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!
इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील ईडी कार्यालयाबाहेर आरजेडी समर्थकांचे जोरदार निदर्शन सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण नोकरीच्या बदल्यात जमिनीशी संबंधित आहे. ज्यामध्ये लालू कुटुंबातील अनेक लोकांची नावे आहेत. लालू प्रसाद यादव यांची दिल्लीतील तपास यंत्रणा पाटणा येथील ईडी कार्यालयात चौकशी करणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्यासोबत त्यांची सून आणि मुलगी मीसा भारतीही आल्याचे वृत्त आहे. याच प्रकरणात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यांचे धाकटे पुत्र तेजस्वी प्रसाद यादव यांचीही चौकशी होणार आहे. मात्र ही चौकशी कोणत्या तारखेला होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.