ललित पाटीलचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात!

ड्रग्ज कारखान्याची जबाबदारी आणि ड्रग्सच्या विक्रीत अन्सारीचा मोठा वाटा

ललित पाटीलचा साथीदार रेहान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात!

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रेहान शेख अन्सारी उर्फ “गोलू” असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नाशिकमध्ये एम डी ड्रग्सचा कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी अन्सारीने ललित पाटिलला मदत केल्याचं समोर आलं आहे.मुंबई पोलिसांनी रेहान अन्सारी याला २० ऑगस्ट रोजी अटक केली होती.त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून रेहान अन्सारीचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहान शेख अन्सारी हा मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करत होता. ललित पाटील आणि भूषण पाटीलने नाशिकमध्ये उभारलेल्या कारखान्यासाठी रेहानने मोठी मदत केली होती. ललित पाटीलने ड्रग्ज रॅकेटची मोठी जबाबदारी या रेहानकडे दिली होती. कुठे आणि कशी ड्रग्ज विक्री करायची, त्यातून किती पैसे मिळणार आहे आणि नाशिकच्या कारखान्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहे. याची सर्व जबाबदारी रेहानकडे होती. रेहान शेख या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं काम करत होता.

हेही वाचा.. 

‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!

अखिलेश यादव-कमलनाथ यांच्यातील वाद चिघळला!

महाराष्ट्राच्या सुवर्ण विजेत्याला आता एक कोटी!

‘हमास पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत’

ड्रग माफियाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
ड्रग्स माफिया ललित पाटील महाराष्ट्रासह इतर राज्यातही ड्रग्ज सप्लाय करत होता. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान सह इतर भागात ड्रग्सचा सप्लाय केला जात होता.तसेच दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात देखील ललित पाटीलची कनेक्शन होते.इतकेच नाहीतर देशाबाहेर देखील ड्रग्सचा सप्लाय करण्याची योजना ललित पाटील आखत असल्याची माहिती त्याच्या तपासात समोर आली आहे.

 

 

 

Exit mobile version