ड्रग्स प्रकरणी सर्व आरोपी गजाआड; ललित पाटील १५ वा आरोपी

मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

ड्रग्स प्रकरणी सर्व आरोपी गजाआड; ललित पाटील १५ वा आरोपी

ड्रगमाफिया ललित पाटीलला मुंबईत पोलिसांकडून अटक करून आज त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणी १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातला ललित पाटील हा १५ वा आरोपी असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. मुंबई पोलिसांतील कायदा सुव्यवस्था सहआयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

दोन आठवडे उलटून सुद्धा गजाआड असलेल्या ड्रगमाफिया ललित पाटीलच्या काल मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला आज त्याला कोर्टात हजार करण्यात आलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली. मुंबई पोलीस पत्रकार परिषदेत म्हणाले, “मुंबई पोलिसांना १० ग्रॅम ड्रग्ज सापडलं होतं. त्याच्या तपास करता करता नाशिक, पुणे येथे धाडी टाकल्या. या सर्व धाडींमध्ये १५० किलो MD ड्रग सापडलं, ज्याची किंमत ३०० कोटी आहे. त्या सर्व प्रकरणामध्ये हे १५ आरोपी आहेत. हे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत”, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा:

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या

जरांगे पाटलांना समज कोण देणार?

ड्रग्जप्रकरणी आतापर्यंत १४ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल ललित पाटीलला अटक केली. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. साकीनाका पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. कोर्टाने ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, न्यायालयात हजर करण्यापूर्वी ललित पाटीलच्या चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होतं. यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना ललित पाटील याने आरोप केला की, “मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन” असं त्याने म्हटलं, यासंदर्भात मुंबई पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, ललित पाटील आज जे काही बोललाय त्याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करतील. आम्ही तपास ड्रग्जच्या दिशेने करणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Exit mobile version