अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यातच आता लालबागचा राजा मंडळाला गणेशोत्सव मंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना काळात लाडक्या राजाच दर्शन घडवून देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला होता. याच पुढाकारामुळे समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करणारे पहिले गणेशोत्सव मंडळ ठरले आहे. याबद्दल युट्यूब इंडिया तर्फे मंडळाला ‘सिल्वर बटन’ प्रदान करण्यात आले आहे.
जगभरात कोरोना महामारीने आपले साम्राज्य निर्माण केले असून, राज्यात सर्वच सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र काही मंडळांनी समाज माध्यमांचा योग्य रीतीने वापर करून भक्तांना ऑनलाईन दर्शन दिले. मुंबई किंवा महाराष्ट्रातून नाही तर आख्या जगभरातून लाखो भाविकांनी ऑनलाईन स्वरूपात लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. डिजिटल टीमला मिळालेले यश हे भाविकांमुळेच शक्य झाले आहे. लालबागचा राजा मंडळाने ऑनलाईन दर्शनासोबतच, सामाजिक उपक्रम सुद्धा भाविकांपर्यंत ऑनलाईन माध्यमात पोहोचवले होते. तसेच यापुढेही ते ऑनलाईन दर्शन किंवा उपक्रम गणेश भक्तांपर्यंत पोहचवत राहतील. यासाठी मंडळ सदैव कार्यरत राहील, असे लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
ऑरगॅनिक केमिस्ट्रीत शिक्षण घेतलेल्याकडे सापडले १४०३ कोटींचे अमली पदार्थ
कोरोना काळात लालबागचा राजा मंडळाने मागच्या २ दोन वर्षांपासून, २४ तास ऑनलाईन दर्शन भक्तांसाठी मोफत उपलब्ध करून दिले होते. तसेच बाप्पाची आरती, उत्सव काळात होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण व वर्षभरात चालू असणारे सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आदी गोष्टी समाज माध्यम व डिजिटल माध्यमाद्वारे भाविकांपर्यंत पोहोचवत होते. तसेच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण भाविकांना ऑनलाईन माध्यमातून पाहता येते.