‘राम का गुन गान करिए’ आणि त्यात लतादीदींनी घेतलेली ती तान

‘राम का गुन गान करिए’ आणि त्यात लतादीदींनी घेतलेली ती तान

लतादीदींची एक आठवण लेखिका जयश्री देसाई यांनी सांगितली. भारतरत्न भीमसेन जोशी आणि लतादीदी राम का गुन गान करिए हे गीत गात होते. त्यावेळची एक अविस्मरणीय आठवण जयश्रीताई सांगतात.

त्या म्हणाल्या की, प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे काकांनी जो अल्बम केला होता त्यातले बाजे रे मुरलिया हे मला गाणं खूप आवडतं. मात्र लतादीदींना बाजे रे मुरलीयापेक्षा राम का गुन गान करिये हे गाणं जास्त आवडतं. आणि या गाण्याची आठवण अशी आहे की, बडे गुलाम अली खान यांचे धाकटे भाऊ बरकत अली खान यांची एक बंदिश होती. त्यातली एक तान त्यांना आवडली होती. खळे काका त्यांना गाताना पूर्ण स्वातंत्र्य देत असत. खळे काकांनी संधी दिल्यावर राम का गुन करिए या गाण्यात त्यांनी ही तान गायली. गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू असताना बाजुला भीमसेन जोशीही होते. खळे काकांनी त्यांना संधी दिल्यावर दीदींनी ती तान राम का गुणगान करिये यामध्ये गायली आहे. भीमसेन जोशी यांनी ती तान ऐकल्यावर रेकॉर्डिंग झाल्यावर लता दीदींचे कौतुक केले आणि ही तान बरकत अली खान यांनी असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

 

लता दीदींच्या मैत्रिणी पद्मा सचदेव यांनी ऐसा कहासे लाऊ’ हे पुस्तक लिहिले होत. हिंदीमध्ये असलेले हे पुस्तक दीदींना मराठीत आणण्याची इच्छा होती. मी जो जावेद अख्तर यांचा तर्कश हा कविता संग्रह मराठीत भाषांतर केला. त्याचं प्रकाशन लतादीदींच्या हस्ते व्हावा अशी माझी इच्छा होती. लतादीदी उत्तम कविता करायच्या, शायरी करायच्या. त्यांना उर्दूची ही उत्तम समज होती. त्यांना ते पुस्तक आवडले. तीनच दिवसांनी त्यांचा मला फोन आला ‘ ऐसा कहासे लावू ‘ हे पुस्तक मराठीत भाषांतर करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली.

२०१३ सालापासून मी त्यांच्या खूप मुलाखती घेतल्या आणि आमची खूप जवळीक होती. त्यांना मी विचारणा केली की त्यांच्या आणि माझ्या आठवणी असे एक पुस्तक करूया. तेव्हा त्या म्हणाल्या करूया पण उषाताई पुस्तक लिहित आहे ते झालं की पुढे बघू. दीदी खूप हळव्या होत्या. त्यांच्या गॅलरीत येणाऱ्या खारूताईंना त्यात शेंगदाणे खाऊ घालायच्या पण त्याचा कंटाळा येत असेल असे वाटून त्या कधी त्यांना बदाम खाऊ घालायचा. आपल्या कुत्र्याला अंगाई गाऊन त्या झोपवायच्या करत झोपवायच्या. त्या खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या होत्या.

Exit mobile version