पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचीही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या खेळाडूला नमवले

पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचीही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा थरार सध्या फ्रान्समध्ये रंगला असून पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या प्री-क्वार्टर फायनलमध्ये बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबा हिला नमवत प्रवेश केला आहे. यानंतर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननेही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या गट टप्प्यातील सामन्यात इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा दोन सरळ गेममध्ये पराभव करून उपउपांत्यपूर्व गाठली आहे.

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या आजच्या सामन्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून होत्या. सेन याचा हा सामना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरूद्ध होता. मात्र, लक्ष्य सेनने चमकदार कामगिरी करत पहिला सेट २१-१८ तर दुसरा सेट २१-१२ असा जिंकला. सामना जिंकून त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये (उपउपांत्यपूर्व फेरी) धडक मारली आहे. पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेननेही अंतिम १६ मध्ये स्थान पक्के केल्याने बॅडमिंटमधील पदकाच्या आशा अजूनही पल्लवित असणार आहेत.

लक्ष्य सेन याचा पहिला गेम अत्‍यंत चुरशीचा झाला आणि त्याने गेममध्ये जोनाथन क्रिस्टीचा २१-१८ असा पराभव केला. हा खेळ २८ मिनिटे चालला. दुसऱ्या गेममध्ये त्याने निर्विवाद आघाडी घेत २१-१२ गुणांनी विजय मिळवला. लक्ष्य सेनचा पहिला सामना शनिवारी केविन कॉर्डनशी झाला होता. यामध्ये त्याने २-० असा विजय मिळवला होता. त्याचा दुसरा सामना ज्युलियन कॅरेजीविरुद्ध झाला. हा सामनाही त्याने जिंकला.

हे ही वाचा:

‘अरविंद वैश्यच्या हत्येमागे बड्या गँगचा समावेश; उद्धव ठाकरे हे जिहाद्यांचे आका’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

बनावट आयुष्यमान कार्ड बनवून योजनेचा लाभ, ईडीचे १९ ठिकाणी छापे !

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला पॅरोलवर सुट्टी देण्यास नकार

दरम्यान, दोन ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने ही दमदार खेळी करत प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. सामन्याचा पहिला गेम सिंधू हिने एस्टोनियन खेळाडू क्रिस्टा कुबाविरुद्ध २१-५ अशा फरकाने जिंकला. या सामन्यात सिंधूने दुसरा गेम २१-१० असा जिंकला.

Exit mobile version