लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला

लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन याला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण स्पर्धेत तो विजयी झाला नसला तरी त्याने त्याच्या खेळणे अनेकांचे मन जिंकले आहे. लक्ष सेन याच्या कामगिरीसाठी त्याच्यावर भारतभरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. साक्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लक्ष सेनचे अभिनंदन केले आहे.

ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लक्ष सेनचा सामना ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जगातील क्रमांक एकचा खेळाडू व्हिक्टर ऍक्सेलसेन याच्यासोबत होता. हा सामना लक्ष सेनसाठी अवघड ठरणार यात काहीच शंका नव्हती. या सामन्यात लक्षने कडवी झुंज दिली पण तरीही त्याचा दोन सरळ सेटमध्ये पराभव झाला. १०-२१ आणि १५-२१ अशा गुणांसह त्याचा पराभव झाला.

पण असे असले तरीही लक्ष सेनेची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मरणारा तो केवळ चौथा भारतीय ठरला आहे. या आधी प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद या तिघांनी हा बहुमान मिळवला आहे. त्यानंतर अशी कामगिरी करणारा सेन हा चौथा भारतीय ठरला आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह…

काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ येतोय!

लक्ष सेन याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, तुझा अभिमान वाटतो! तू दाखवलेली धैर्य आणि दृढता उल्लेखनीय आहे. तू उत्साहाने लढा दिलास. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे की तू यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करत राहशील.”

तर सचिन तेंडुलकर त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “आयुष्यात अपयश येत नाही. तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता. मला खात्री आहे की तू या अनुभवातून खूप काही शिकला असशील. आगामी स्पर्धांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.”

Exit mobile version