भारतीय वायुसेनेचा (IAF) एअर शो चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा एअर शो पाहण्यासाठी लोकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. अशातच या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडली असून एअर शोमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चेन्नईच्या मरीना बीचवर जवळपास १२ लाखांहून अधिक लोकांचा जमाव एअर शो पाहण्यासाठी जमला होता. अशातच उष्णता आणि गर्दी यामुळे उपस्थित लोकांना त्रास सहन करावा लागला. यात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले.
भारतीय वायू सेनेकडून हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी विस्तीर्ण अशा मरीना बीचवर १२ लाखांहून अधिक लोक जमले होते. सकाळी ११.३० वाजताच्या कार्यक्रमाला लोकांनी सकाळी ७ वाजताच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कुटुंबे, तरुण आणि वृद्ध लोक रेल्वे, मेट्रो, बस आणि खाजगी वाहनांद्वारे बीच परिसरात पोहचले होते. हजारो चारचाकी आणि दुचाकी याठिकाणी पोहचल्या होत्या. त्यानंतर साधारण १ वाजता कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण जमावाने एकाच वेळी परिसर सोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रचंड गर्दी निर्माण झाली आणि हालचालीही ठप्प झाल्या. त्यामुळेच लोकांना त्रास व्हायला सुरुवात झाली अशी माहिती आहे.
हे ही वाचा :
चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ – शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी!
‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!
बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’
शोसाठी उपस्थित असलेल्या अनेकांना डिहायड्रेशन आणि चक्कर येण्याचा त्रास झाला कारण तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. शिवाय जवळपास पाणी किंवा वैद्यकीय मदतीची कोणतीही तरतूद उपलब्ध नव्हती, असे उपस्थितांनी सांगितले. शिवाय सार्वजनिक वाहतुकीवरही जबरदस्त ताण आला आणि रेल्वे स्थानकांवरही गर्दी उसळली होती.