विकसित भारताच्या वाटचालीत मातृशक्तीचा मोठा हातभार; लखपती दीदींना मोदींचे अभिवादन !

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका

विकसित भारताच्या वाटचालीत मातृशक्तीचा मोठा हातभार; लखपती दीदींना मोदींचे अभिवादन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (२५ ऑगस्ट) जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी देखील जारी करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणासाठी सुरु केलेल्या अनेक उपक्रमांबद्दल सांगितले. तसेच ‘महिला विरुद्ध अपराध हा अक्षम्य पाप आहे, दोषी कोणीही असो वाचता कामा नये. त्या प्रत्येकाचा हिशेब व्हायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. महिला अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार नवीन कायदा आणत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान आज सकाळी जळगावमध्ये आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी सोहळ्याच्या अगोदर बचत गट महिलांशी संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लखपती दीदीं मेळाव्यात भाषण केले. पंतप्रधान मोदींनी सुरवातीला जन्माष्टमीच्या शुभेच्या दिल्या. नेपाल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांप्रती त्यांनी आपल्या वेदना प्रकट केल्या. या दुर्घटनेत जळगावमधील अनेकांचे निधन झाले, या सर्व पिडीत परीवारांप्रती संवेदना व्यक्त करत आहे. केंद्राकडून आणि राज्याकडून यांना पूर्णपणे मदत दिली जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लखपती दिदीचा आज महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थितीत आहेत. देशभरातील लाखो सखी मंडळांसाठी ६ हजार करोडहून अधिकचा निधी जारी करण्यात आला आहे. लाखो बचत गटाची जोडले गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना देखील कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांमधून लाखो भगिनींना ‘लखपती दीदी’ बनवण्यास मदत मिळेल.

पंतप्रधान मोदींचा नुकताच विदेश दौरा पार पडला. ते म्हणाले, मी आताच युरोपीय देश पोलंडहून आलो आणि  महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन तेथे मला झाले. तेथील लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पोलंडच्या राजधानीत एक ‘कोल्हापूर मेमोरिअल’ आहे. कोल्हापूरच्या लोकांच्या सेवेसाठी आणि सत्कारच्या भावनांना सन्मान देण्यासाठी पोलंडच्या लोकांनी ते बांधले आहे. यावेळी पंतप्रधानांनी दुसऱ्या विश्व युद्धाचा उल्लेख करत पोलंडच्या नागरिकांना कोल्हापूरच्या राजघराण्याने आश्रय देवून त्यांची कशा प्रकारे सेवा केली याचा संदर्भ दिला.

हे ही वाचा :

पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; ९६० लोकल फेऱ्यांवर होणार परिणाम

बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात अमरावतीत आक्रोश !

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी

इस्रायल, हिजाबुल्ला आमनेसामने; एकमेकांवर डागली रॉकेट्स

ते पुढे म्हणाले, जळगाव हे वारकरी परंपराचे तीर्थ आहे. महान संत मुक्तीची ही भूमी आहे. इतिहासात महाराष्ट्रातील मातृ शक्तीचे योगदान खूप मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला माता जिजाऊने दिशा दिली. समजात मुलींचा शिक्षणाला आणि कामाला महत्व दिले जात न्हवते तेव्हा सावित्री बाई फुले पुढे आल्या. भारत देश विकसित बनण्याच्या दिशेने असून त्यासाठी भारतातील मातृ शक्ती पुढे येत आहे.

महाराष्ट्रातील भगिनी खूप मेहनत करत आहे, तुमच्या सर्वांमध्ये राजमाता जिजाऊ आणि सावित्री बाई फुले यांची प्रतिमा पाहतो. लोकसभा निवडणुकी दरम्यान तीन करोड बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे मी म्हणालो होतो. गेल्या १० वर्षात १ करोड लखपती दीदी बनल्या आणि केवळ मागील दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी त्यामध्ये अधिक जोडल्या गेल्या. तसेच महाराष्ट्रातील १ लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना सशक्त करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा सहभाग आहे. मुले ,महिला, पुरुष, वृद्ध नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राज्यातून चालवल्या जात आहेत. भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनत आहे आणि यामध्ये महिला, बहिणींचा मोठा सहभाग आहे.

ते पुढे म्हणाले, पूर्वीची परिस्थिती महिलांसाठी अत्यंत वेदनादायी होती, मात्र तुमच्या भावाने महिला सशक्ती करणाचा संकल्प घेतला आणि मोदी सरकारने महिलांच्या हितासाठी निर्णय घेतले. ते पुढे म्हणाले, माझे आव्हान आहे, एकीकडे विरोधकांचे ७० वर्ष तबकडीच्या एका बाजुला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचे १० वर्ष ठेवा. आमच्या सरकराने माता, बहिणींसाठी जे केले आहे ते आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर कोणीच केले नाही. मुलींसाठी प्रत्येक क्षेत्र सुरु करत आहोत, ज्यात आधी बंदी होती. माता, भगिनींचे सामर्थ्य वाढवण्यासह त्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे.

मी प्रत्येक राज्यातील राजकीय पक्ष्याला, राज्य सरकारला सांगेन की, ‘महिला विरुद्ध अपराध हा अक्षम्य पाप आहे,  दोषी कोणीही असो वाचता कामा नये, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोषीला कोणत्याही स्वरुपात मदत करणारा देखील वाचला नाही पाहिजे. हॉस्पिटल, शाळा किवा पोलीस व्यवस्था असो ज्या स्तरावर लापरवाही होते, त्या प्रत्येकाचा हिशेब व्हायला हवा. महिलांवरील अत्याचारा विरोधात कायदा कडक करण्याचे काम सुरु आहे. नवीन कायद्यानुसार अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे, राज्यासोबत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version