लोकलच्या डब्यांमध्ये काही महिलांमध्ये जोरदार भांडण ,मारामाऱ्या झाल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. नोकरदार महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सीट मिळण्यावरून रोजच्या रोज भांडणे ठरलेली असतात. परंतु भांडणे होण्यामागे महिलांसाठी लोकलमध्ये राखीव असलेल्या डब्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे दिसून आले आहे.
महिलांसाठी विशेष लोकल सुरू केली असली तरी त्याची संख्या ही कमी पडत आहे त्यामुळेच अलीकडे महिलांमध्ये जागांवरून वादविवादाचे प्रसंग वाढत चालले आहेत. ठाणे पनवेल लोकलमध्ये महिलांच्या गटात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला रेल्वे प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा प्रकाश होतात आल्या आहेत.
बारा डब्याच्या लोकलमधून गर्दीच्या वेळी साधारणपणे ९०० महिला प्रवासी करतात असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बारा महिला विशेष लोकल धावतात. १२ डब्यात ११८ आसन क्षमता असते पण त्या उलट २,३३६ प्रवासी उभे राहून प्रवास करतात एकूण ३५०४ प्रवासी एका लोकांमधून प्रवास करतात. त्यामध्ये अंदाजे ९० महिला प्रवासी असतात पण त्यांच्यासाठी राखीव असणारे तीनच डबे असल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिंदे गट ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
दुसरीकडे बारा डबालोकलमध्ये महिलांचा दुसरा वर्ग आणि फर्स्ट क्लास मिळून एकूण तीनच डबे असतात. एका कोचची आसने आणि उभ्याने प्रवास करण्याची आसन क्षमता ३०० आहे. दुसरा वर्ग आणि फर्स्ट क्लास मिळून चारच डबे असतात . महिलांमधील रोजची भांडण आणि मारामाऱ्या कमी करायची असतील तर महिलांसाठीच्या राखीव डब्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत