मुंबई अग्निशमन दलाने २ स्वयंचलित अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मनुष्यबळाची बचत होईल आणि त्यांचा बचाव कार्यासाठी वापर करता येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या मुंबई अग्निशामक दलात आधुनिक पाण्याच्या टाक्या आणि पंप असलेली यंत्रणा नाही. त्यामुळे अग्निशमन कार्यादरम्यान किमान चार जणांना शिडी लावावी लागते, पाण्याची टाकी जोडावी लागते आणि जी बाहेरून पंप लावावा लागतो.
या प्रक्रियेत वेळ लागतो, मनुष्यबळ जास्त प्रमाणात लागतो आणि काहीवेळा बचावकार्यास विलंब होतो. स्वयंचलित शिडीच्या वाहनांमुळे वेळ कमी होईल आणि मनुष्यबळाची बचत होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई अग्निशामक दलाकडे अग्निशमक इंजिन, पाण्याचे टँकर आणि शिडी व्हॅन यांसारखी २५० हून अधिक उपकरणे आहेत. सुमारे २० शिड्या आहेत. तसेच या अत्याधुनिक शिडी २ मिनिटात १८ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते. तर या दोन अत्याधुनिक शिड्यांची किंमत ही सुमारे २० कोटी ७४ लाख २९ हजार रुपये इतकी असून ऑस्ट्रेलिया येथून समुद्रामार्गे मुंबई या गाड्या महिन्या भरात पोहोचणार आहेत.
हे ही वाचा:
सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राहुल गांधींची! गुळगुळीत मेंदूचा
बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने
‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश
एकनाथ शिंदेंनी अशी काही कांडी फिरवली की…
अत्याधुनिक गाड्यांचे मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर वाहन परिवहन विभागातर्फे त्यांचे रेसिस्ट्रेशन करण्यात येईल. तसेच मुंबईमध्ये टोलेजंग इमारतीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संबधित टॉवर मध्ये आग लागल्यास मदत पोहोचवणे कठीण होत जाते अशा वेळी आणखी मोठी जीवीतहानी होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी महानगर पालिकेने २ अत्याधुनिक वाहने मागण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलियन कंपनीला या गाड्यांची ऑर्डर देण्यात आली होती. या गाड्या समुद्रामार्ग मुंबईत दाखल झाल्यानंतर या गाड्यांचे रेसिस्ट्रेशन करण्यात येईल असेल विधान मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी केले.