महिलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी लाडकी बहिण योजना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

महिलांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी लाडकी बहिण योजना

महाराष्ट्रातील महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहायला हवे म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, आमदार झीशान सिद्दिकी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजपर्यंत राज्यातील १ कोटी १० महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे ३ हजार रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील २ ते २.५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महायुती सरकारने महिला. युवक, युवती, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. या लाडकी बहिण योजनेसाठी वर्षाला ४५ हजार कोटी रुपये लागणार आहेत त्याची सोय सरकारने केली आहे. या सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी, युवकांसाठी योजना आणली आहे. विरोधक मात्र आमच्यावर टीका करत आहेत. या योजनेच्या विरोधात ते न्यायालयात गेले. परंतु न्यायालयाने त्यांना हा सरकारचा अधिकार असल्याचे सांगितले. आम्ही काम करणारी माणसे आहोत.

हेही वाचा..

नारळी पौर्णिमेला मालवणमध्ये बोट उलटून तिघे बुडाले!

‘कोलकात्यातील रुग्णालयावर झालेला हल्ला ममता बनर्जी पुरस्कृत’

अनिल देशमुख, संजय राऊतांचे गँग भोजन…नितेश राणेंनी शेअर केले फोटो !

बलात्कार पीडितेचे पालक संतापले! म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला

आम्ही माणुसकीचा, शेवटच्या माणसाचा विचार करतो. त्यामुळे अशा योजना आम्ही आणू शकलो. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावे, असे आवाहन पवार यांनी केले. वाढवण प्रकल्पच्या कामाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईचे विमानतळ लवकरच सुरु करणार आहोत. मुंबईत मेट्रोची कामे गतीने सुरु आहेत. अटल सेतू असेल किंवा अन्य पायाभूत सुविधा असतील अशी अनेक कामे मुंबईत करता आली, असेही पवार म्हणाले. विकास कामात मुंबईला कुठेही मागे राहून देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Exit mobile version