25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषयात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

पर्यटकांच्या गाड्यांना साधी पार्किंग व्यवस्था, पानपोई, शौचालये अपुरे, पर्यटकांचे हाल

Google News Follow

Related

गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ. गणपतीपुळ्याची मूर्ती स्वयंभू आहे. सोबत पुळ्याचा समुद्र आणि सफेद वाळूचा किनारा असल्याने येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला आवर्जून भेट देतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांना येथे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

गणपतीपुळ्यात प्रवेश करताना ग्रामपंचायतीकडून यात्रा कर पर्यटकांकडून घेतले जाते. मात्र पर्यटकांच्या गाड्यांना साधी पार्किंग व्यवस्था देखील नाही. मौर्या चौकातील एक छोटीशी काय ती पार्किंग व्यवस्था पुळ्याच्या मंदिरापाशी उपलब्ध आहे. ही जागा अपूरी असल्याने पर्यटक रस्त्यावरच दोन्ही बाजूला गाड्या पार्क करून मंदिरात जातात. त्यामुळे रस्ता जाम होतो. याला जोड म्हणून गेल्या काही वर्षांपासून धंदेवाले आपटा चौक ते मौर्या स्थान या रस्त्यावर दुतर्फा धंदा लावून जागा अडवतात. आधीच रस्ता लहान आणि त्यात गाडीवाले रस्त्यात गाड्या पार्क करतात. त्यात भर म्हणजे फेरीवाले. त्यामुळे एखाद दिवशी येथे अपघात होण्याची संभावना निर्माण होऊ शकते, असे स्थानिक सांगतात.

गणपतीपुळ्यात देवस्थान, एमटीडीसी, ग्रामपंचायत अशा तीन संस्था आहेत. परंतु यात्रा कर घेऊनही गावात पर्यटकांना पार्किंग व्यवस्थेची सोय नाही. पर्यटकांना पार्किंग व्यवस्था सोय करून दिली पाहिजे. मंदिरातील पिण्याच्या पाण्याची सोय वगळता इतर पाण्याची व्यवस्था गावात नाही. पर्यटकांसाठी पाणपोईची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. सोय नसल्याने पर्यटक पिण्याच्या पाण्याच्या बॉटल पाणी पिऊन झाल्यावर मंदिर परिसरात फेकून देतात. परंतु या तिन्ही व्यवस्था या समस्यांकडे कानाडोळा करताना दिसतात, असे विलास देवरुखकर यांनी सांगितले.

गणपतीपुळ्याला वर्षापूर्वी तयार झालेला डांबरी रस्ता विकासाच्या नावाने खराब केला आहे. भूमिगत गटारं बांधताना रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून जागोजागी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पर्यटक धुळीने त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा :

आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी

साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप

वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुष्प अंमळनेरमध्ये गुंफणार

गणपतीपुळ्यातही परप्रांतीय धंदेवाल्यांची एण्ट्री होताना दिसत आहे. हे जागोजागी रस्त्यातच धंदे करतात. याला स्थानिकांकडून विरोध होताना दिसून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी. गावातील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एका युवकाने अर्जही केला होता. या अर्गाजात गावातील लोकांना रोजगार मिळावा, स्थानिकांनाच नोकऱ्या देण्यात याव्या, असे म्हटले होते. परंतु यालाही कोणीही जुमानत नाहीत, असे खासगीत एका धंदेवाईकाने सांगितले.

मंदिराच्या आसपास एक देवस्थानच्या समोर आणि एक पाठीमागे अशी दोन सुलभ शौचालय आहेत. पर्यटकांची संख्या पाहता ही संख्या अपुरी असल्याने पर्यटकांचे हाल होताना दिसत आहेत. ही शौचालयातही पैसे घेतले जातात. त्यामुळे सामान्यांना तिथे पैसे दिल्याशिवाय वापरता येत नाही. समुद्रावर कचराकुंडी जाळीची केल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याी शक्यता आहे. ती तातडीने बंदिस्त करायला हवी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा