खादी व ग्रामोद्योग मंडळाने लेह- लडाखच्या पडीक जमिनींना हिरवळीखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी योजना देखील खादी व ग्रामोद्योग मंडळाने बनविली आहे. या योजने अंतर्गत हिमालयातील भूभाग बांबू लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाने हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलाचे सहाय्य घेतले आहे. त्यासोबतच लोह-लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाचे सहाय्य घेऊन चुचोत गावात सुमारे १००० बांबू रोपांची लागवड केली आहे. बांबूची ही लागवड आजवर पडीक आणि वापरात नसलेल्या सुमारे २.५० लाख चौ. फुट जमिनीवर करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरूवात खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. विनय कुमार सक्सेना यांनी तेथील स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत केली होती.
हे ही वाचा:
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल
तीन तिघाडा; अध्यक्षाची निवड म्हणून होईना
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तीन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने २० बांबूची रोपे त्यांच्या परिसरात लावली होती. ही रोपे देखील खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून भेट देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाळवंटीकरण रोखण्यासाठी दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्राऊट (बोल्ड) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी ठरवण्यात आलेल्या खादी बांबू फेस्टिवलचा हा भाग असल्याचे कळले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार लेहमध्ये बांबूची रोपे लावणे तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे अतिशय आव्हानात्मक होते. सध्या मान्सून काळ चालू असल्याने आत्ता लावलेल्या बांबू रोपांची मूळे घट्ट होण्यास पुरेसा वेळ मिळेल आणि त्यानंतर जेव्हा बर्फवृष्टी चालू होईल तेव्हाच्या खडतर वातावरणाला बांबूची रोपे समर्थपणे तोंड देऊ शकतील.
बोल्ड प्रकल्पांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाने आत्तापर्यंत १२,००० रोपांची लागवड केली आहे. यामध्ये लेहमध्ये लावलेल्या १००० रोपांचा समावेश होतो. त्याशिवाय तीन जागांवर मिळून एकूण सुमारे १७.३७ लाख चौ. स्क्वेअर फुटांवर देशभरात लागवड करण्यात आली आहे. यामध्ये उदयपूर मधील निचला मांडवा, अहमदाबाद येथील ढोलेरा आणि जैसलमेर जिल्ह्यातील तानोत या बरोबरच लेहमधील चुचोत येथील लागवडींचा समावेश होतो.