कुर्ला बस अपघात प्रकरणी बेस्टने कंत्राटदाराला नोटीस बजावली असून ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. यासह अपघातात जखमी झालेल्या ४१ जणांच्या रूग्णालयाच्या खर्चाची सुमारे ४-५ लाख रुपयांची परतफेड मागितली आहे.
बेस्ट ट्रॅफिकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उल्लंघन केल्याप्रकरणी करारानुसार दंड आकारला जाईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अशा घटनांमध्ये रुग्णालयाची बिले भरणे ही खाजगी कंत्राटदाराची प्रमाणित पद्धत आहे .
नुकसान भरपाई आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बेस्टने स्थापन केलेल्या समितीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या नुकसान भरपाईची रक्कम खासगी कंत्राटदाराकडून वसूल करण्याची समितीची योजना आहे.
हे ही वाचा :
७६५ बळींचा मानकरी अश्विनचा क्रिकेटला अलविदा!
रशियाच्या मदतीला आलेल्या उ. कोरियाच्या सैन्याने चुकून रशियन सैन्यावरचं केला गोळीबार
“आज याला भेट, त्याला भेट आणि दुसर्या दिवशी घरी थेट, अशी उद्धव ठाकरेंची परंपरा”
मणिपूरमध्ये जप्त केलेल्या शस्त्रांत मस्क यांच्या स्पेसेक्स स्टारलिंकचे डिव्हाइस
९ डिसेंबर रोजी घडलेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४१ जण जखमी झाले होते. मंगळवारी (१७ डिसेंबर) समितीच्या सदस्यांनी अख्तर खान (५२) या जखमी पीडितेची भेट घेतली, ज्याला भाभा रुग्णालयातून नुकतीच डिस्चार्ज देण्यात आला होता. समितीचे सदस्य डॉ.अनिल कुमार सिंगल यांनी पुष्टी केली की खान या ऑटोरिक्षा चालकाला पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती पण आता तो धोक्याबाहेर आहे. बेस्टने त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची सोय केली आहे आणि त्याच्या ऑटोरिक्षाला झालेल्या नुकसानीची भरपाईही दिली जाणार आहे.