कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक टीका करणारे विडंबन गीत सादर केले होते. यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या स्टुडीओची तोडफोड केली. कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल केली. शिवाय याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामरा याने माफी मागावी, असा इशारा दिला. मात्र, यानंतरही कामरा याने सोशल मीडियावरून मी जमावाला घाबरत नाही, मी माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरही कुणाल कामरा याने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करून नवे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
कुणाल कामरा याच्या कार्यक्रमानंतर राज्यभरात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याचे व्हिडीओ असलेले एक गाणे पोस्ट केले आहे. ‘मन में हैं अंधविश्वास…’ असे हे गाणे असून या गाण्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात खार पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तो उपस्थित राहिला नाही. शिवाय तो महाराष्ट्रातचं नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व वादावादी दरम्यान कुणाल याने मंगळवार, २५ मार्च रोजी पुन्हा एकदा “हम होंगे कामयाब…, हम होंगे कामयाब…, हम होंगे कामयाब एक दिन…, मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश….” असे बोल असलेले गाणे पोस्ट केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्याने सत्ताधारी पक्षांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
👀👀👀 pic.twitter.com/C5Bnn81p5E
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 25, 2025
हेही वाचा..
दिशा सालियन प्रकरण: बॉलीवूड कलाकारांसह आदित्य ठाकरेंविरोधात नवी तक्रार
जयकुमार गोरेंना अडकविण्यात शरद पवारांची माणसं, सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे आरोपींना फोन!
जगातील सर्वात जुनी डाळ, जी पोटातील पथरी देखील विरघळवण्याची क्षमता ठेवते
औषधीय गुणांनी परिपूर्ण कौंच बिया, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर
‘हम होंगे कंगाल…’ हे गाणं कुणाल याने यापूर्वीच गायले होते. या जुन्या गाण्याला त्याने सध्याचे व्हिडीओ जोडले असून पोस्ट केलं आहे. तेव्हा त्या गाण्याच्या माध्यमातून त्याने पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्यावेळीही या गाण्यावरून वाद झाले होते. आता पुन्हा एकदा त्याने हे गाणे पोस्ट केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.