कुंभमेळ्याला आज (१३ जानेवारी) पासून सुरवात झाली असून लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. देशासह परदेशातील नागरिकही कुंभमेळ्यात सहभागी होत आपला अनुभव सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम बहुल देश तुर्कीतील एक मुस्लीम महिला महाकुंभात सामील होत संगमात स्नान केले. डोक्यावर टीळा लावत सनातन धर्माच्या मार्गावर चालण्याचा अनुभव घेतला.
पिनार असे परदेशी महिलेचे नावे आहे. पिनार यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मित्रांकडून महाकुंभबद्दल ऐकले होते आणि त्यांना भारतात येऊन ते पाहण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. महाकुंभाच्या वातावरणात त्यांचे भारतीय संस्कृतीबद्दलचे आकर्षण पूर्णपणे जाणवत होते. यावेळी त्यांना आलेला अनुभव हा अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
पिनार यांच्यासाठी महाकुंभ हा आध्यात्मिक प्रवास ठरला. त्यांनी डोक्यावर गंधाचा टीळा लावत, जप करत, सनातन धर्माप्रती आदर आणि श्रद्धा व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, महाकुंभाच्या वातावरणामुळे भारतीय परंपरांची खोली समजून घेण्याची संधी मिळते. दरम्यान, महाकुंभ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून जगभरातील लोकांना भारतातील विविधतेशी आणि धार्मिकतेशी जोडणारा सांस्कृतिक अनुभव आहे, हे त्यांच्या अनुभवावरून दिसून येते. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ चालणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत, होत आहेत.
हे ही वाचा :
ऑनर किलिंग रोखण्यासाठी ‘सुरक्षागृह’ निर्णयाची अंमलबजावणी करावी
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार
भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याला भाविकांचा भरघोस प्रतिसाद!