कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी आज पुन्हा एकदा एक गंभीर अशी वॉर्निंग देशातील जनतेला दिली आहे. ही वॉर्निंग आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातील आहे. ट्विटरच्या माध्यमातून कुमार विश्वास यांनी हा गंभीर इशारा दिला असून त्यांनी आपल्या जुना एका वॉर्निंगची आठवण करून दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कुमार विश्वास यांनी नाव न घेता अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?
रविवार, ८ मे रोजी सकाळी हिमाचल प्रदेश मधील धर्मशाला येथे खलिस्तानवादी झेंडे निदर्शनास आले. धर्मशाला स्थित हिमाचल प्रदेशच्या विधानसभा भवनाच्या दारावर हे झेंडे लावण्यात आले होते.

तापिवन येथे असलेल्या विधानसभेच्या संरक्षक भिंतीवर तसेच मुख्य प्रवेशद्वारावार काही समाजकंटकांनी हे ध्वज लावल्याचे स्पष्ट झाले आहे. खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही त्यावर लिहिलेल्या आहेत. हे झेंडे आता उतरविण्यात आले आहेत आणि भिंतीवर लिहिलेल्या घोषणाही पुसून टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांना यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

याच मुद्द्यावरून कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. आधीही मी या संदर्भातील चेतावणी दिली होती. आता त्यांची नजर वेगळ्या प्रदेशावर आहे असे विश्वास यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

टाटा कंझ्युमर एकदम कडॅक!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कायम खलिस्तानचे समर्थक राहिले आहेत. तसेच आपण त्यांच्यासोबत असताना ते अनेकदा त्यांच्या योजनांबद्दल सांगत असायचे. मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन, असे ते म्हणाले होते असा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे. ‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक आहेत. सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.

Exit mobile version