पंतप्रधानांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश, एलईटीच्या तीन दहशतवाद्यांना अटक!

एके-सिरीज रायफल, ग्रेनेड, दारूगोळा जप्त

पंतप्रधानांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश, एलईटीच्या तीन दहशतवाद्यांना अटक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातून तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. कुलगाम जिल्ह्यातील कैमोह भागात लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली आणि कुलगामच्या कैमोहमध्ये एलईटी/टीआरएफच्या तीन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली.

उबेद खुर्शीद खांडे, मकसूद अहमद भट आणि उमर बशीर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण ठोकरपोरा, कैमोह, कुलगाम येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून दोन एके-सिरीज रायफल, ग्रेनेड आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी कुलगाममध्ये दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. तत्पूर्वी, सुरक्षा पथकाने कारवाई करत तीनही दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान मोदी १३ जानेवारी रोजी झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी काश्मीरला भेट देणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत तीनही दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे.

हे ही वाचा : 
सनातन धर्म…च्या गुजराती आवृत्तीचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते शानदार प्रकाशन
४७ वर्षांनंतर संभल दंगलग्रस्तांना मिळणार न्याय?, १९७८ च्या दंगलीच्या चौकशीचे आदेश!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं….
टीटीपी दहशतवादी गटाकडून पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचे अपहरण
Exit mobile version