पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातून तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. कुलगाम जिल्ह्यातील कैमोह भागात लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली आणि कुलगामच्या कैमोहमध्ये एलईटी/टीआरएफच्या तीन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली.
उबेद खुर्शीद खांडे, मकसूद अहमद भट आणि उमर बशीर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण ठोकरपोरा, कैमोह, कुलगाम येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे.
दहशतवाद्यांकडून दोन एके-सिरीज रायफल, ग्रेनेड आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी कुलगाममध्ये दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. तत्पूर्वी, सुरक्षा पथकाने कारवाई करत तीनही दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान मोदी १३ जानेवारी रोजी झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी काश्मीरला भेट देणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत तीनही दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे.
#WATCH | Kulgam, J&K: Kulgam Police along with Army (1RR, 1Para(SF)) and CRPF (18 BN), apprehended three terrorist associates of proscribed terrorist outfit LeT/TRF, namely, Ubaid Khursheed Khanday son of Khursheed Ahmad Khanday, Maqsood Ahmad Bhat S/O Mohd Ramzan Bhat and Umer… pic.twitter.com/YxWhYZ3Pmz
— ANI (@ANI) January 9, 2025