शाळा फक्त चार तास ठेवा! एक दिवस ऑनलाइन

शाळा फक्त चार तास ठेवा! एक दिवस ऑनलाइन

राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी होत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे राज्य सरकारकडून शाळांबाबत कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. अनेक पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी केली होती. आता बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलानेही शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना सरकारला केल्या आहेत. शाळा सुरू केल्यास दररोज चार तास शाळा असावी. एक दिवस प्रत्यक्ष आणि एक दिवस ऑनलाईन असे नियोजन असावे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, अशा सूचना कृती दलाने केल्या आहेत.

दीड वर्षांपासून शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कमालीचे मोबाईल व्यसन जडले आहे. एकटेपणामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मुलांमधील संवाद खुंटला आहे. घरात राहून त्यांच्यातील चंचलता कमी झाली झाली आहे. अनेक मुलांचे पोषणही शाळांशी संबंधित असते. त्यामुळे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत कृति दलाचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांची सभा घेऊन विविध मुद्दे जाणून घेता येतील. शंकांचे निरसन होईल, चर्चा होतील. मुले आजारी असल्यास पालकांनी त्यांना शाळेत पाठवू नये. शाळा जवळ असल्यास शक्यतो पालकांनी त्यांना सोडायला शाळेत यावे किंवा त्यांना चालत पाठवावे. मुलांकडे मुखपट्टीचे तीन सेट असावेत, असेही डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले.

शाळेचा प्रवेश, डबा खाण्याची जागा, स्वच्छतागृहे, वर्गातील प्रवेश अशा जागी निर्जंतुकीकरणाची सोय असावी. शाळेतील वर्गांचे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण अत्यावश्यक. शाळा सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेत भरावी. शाळेमध्ये आरोग्य केंद्र सुरू करावे. त्यात प्राथमिक उपचारसाठीचे साहित्य असावे. परिचारिका, डॉक्टर यांची नेमणूक करता येऊ शकेल. शाळेतील आरोग्य केंद्रात जवळच्या डॉक्टरांचा, रुग्णवाहिकेचा, रुग्णालयाचा क्रमांक नमूद केलेला असावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे सरकारला सुचवण्यात आली.

Exit mobile version