कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण

कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने आणखीन एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पुरुष एकेरीच्या एसएच६ या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने हाँगकाँगच्या चु माँ काई याचा पराभव केला आहे. एसएच६ बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणारा पहिला भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू ठरला आहे. तर त्या आधी एसएल४ या क्रिडा प्रकारात सुहास यतीराज याने रौप्य पदक आपल्या नावे केले आहे.

एसएल ४ या प्रकाराच्या अंतिम फेरित सुहास यतिराजचने धडक मारली. फ्रान्सचा पॅरा बॅडमिंटनपटू लुकास माजूर याच्यासोबत रविवार, ५ सप्टेंबर रोजी सुहासचा सामना रंगला होता. या सामन्यात सुहासचा २१-१५, १७-२१, १५-२१ असा पराभव झाला. फ्रान्सचा लूकास माजूर हा एसएल४ प्रकारातील जगातील अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू आहे.

हे ही वाचा:

शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

पंतप्रधान मोदी जगात भारी!

रोहितच्या ऐतिहासिक शतकामुळे भारत मजबूत स्थितीत

तर एसएह६ या प्रकारात कृष्णा नागर याने हाँगकाँगच्या चु माँ काई याचा २१-१७, १६-२१, २१-१७ असा पराभव केला आहे. कृष्णा नागरच्या या कामगिरीमुळे भारताला पॅरा बॅडमिंटन क्रीडा प्रकारात दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. तर यासोबतच भारतातची टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये पदकांची एकूण आकडेवारी ही १९ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तर आठ रौप्य पदके आणि सहा कांस्य पदके आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणेच ट्विटरच्या माध्यमातून सुहास यतिराज आणि कृष्णा नागर यांचे अभिनंदन केले आहे. तर येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Exit mobile version