मथुरेतील कृष्ण जन्मभूमीशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परिसरात मुगल शासक औरंगजेबाने मशिदीसाठी हिंदू मंदिर तोडले होते, असे माहिती अधिकार कायद्याखाली आलेल्या एका अर्जात भारतीत पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र आरटीआयमध्ये विशेषतः कृष्ण जन्मभूमीचा उल्लेख नाही. मात्र यात केशवदेव मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. शाही ईदगाह हटवण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आरटीआयने हे दिलेले उत्तर महत्त्वाचे ठरू शकते.
उत्तर प्रदेशमधील मैनपुरीचे अजय प्रताप सिंह यांनी आरटीआय दाखल करून केशवदेव मंदिर तोडल्या गेल्या संदर्भात माहिती मागितली होती. हे मंदिर कृष्ण जन्मभूमी परिसरात होते, असा दावा करण्यात आला होता. त्यावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या आग्रा सर्कलच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. त्यावर वादग्रस्त स्थळावरील केशवदेव मंदिराला मुगल शासकाने तोडले होते, या दाव्याला पुष्टी मिळत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने मथुरा कृष्ण जन्मभूमीच्या १९२०च्या गॅजेटमधील ऐतिहासिक नोंदींच्या आधारे ही माहिती दिली आहे. यात गॅझेटचा काही अंशही आहे. ‘कटरा टेकडीवरील काही भागावर केशवदेव मंदिर होते. ते तोडण्यात आले आणि औरंगजेबाने त्या जागेचा वापर मशिदीसाठी केला,’ असे या गॅजेटमध्ये नमूद आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार
मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा
मुलुंडमध्ये भरदिवसा रस्त्यात डिलिव्हरी बॉयची हत्या
संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मशिदीच्या विरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी एक असणारे वकील महेंद्र प्रताप सिंह हे लवकरच या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे अलाहाबाद न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. ‘ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आम्ही आमच्या याचिकेत नमूद केले आहे की, औरंगजेबने इसवी सन १६७०मध्ये मथुरातील केशवदेव मंदिर तोडण्याचे फर्मान जारी केले होते,’ असे त्यांनी सांगितले.